CSK vs LSG : केएल राहुल, डी कॉक पडले भारी; लखनौचा चेन्नईवर ८ गडी राखून दणदणीत विजय

लखनऊने कर्णधार केएल राहुल आणि क्विंटनच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला.

0
CSK vs LSG
CSK vs LSG

नगर : आयपीएल २०२४ च्या रणसंग्रामात काल (ता.१९) लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) आठ गडी राखून पराभव केला. लखनऊने कर्णधार केएल राहुल आणि क्विंटनच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला. केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकच्या १०० अधिक भागीदारीच्या जोरावर लखनऊने विजय प्राप्त केला. चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या सलामीवीरांनी १५ षटकांपर्यंत एकही विकेट न गमावता दमदार फलंदाजी केली. केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकने पहिल्या विकेटसाठी १२७ धावांची दमदार भागीदारी केली.

नक्की वाचा : शिर्डी लाेकसभेसाठी बड्या नेत्याचा अर्ज; दिग्गजांची उपस्थिती

केएल राहुलने वादळी खेळी करत संघाला मिळवून दिला विजय (CSK vs LSG)

क्विंटन डीकॉकला १५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मुस्तफिजूरने धोनीकडून झेलबाद केले. तर केएल राहुल १८ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला. पथिरानाने टाकलेल्या चेंडूवर केएलने एक चांगला शॉट मारला मात्र रवींद्र जडेजा तिथे तैनात होता आणि त्याने हवेचत झेप घेत शानदार झेल टिपला. राहुल वादळी खेळी करत ५३ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संघाला विजय मिळवून दिला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा : माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय?; सुजय विखेंचा विरोधकांवर घणाघात

लखनऊच्या गोलंदाजांचे चेन्नईला धक्के (CSK vs LSG)

या सामन्यात नाणेफेक जिंकत लखनौने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या चांगलाच पथ्यावर पडला. चेन्नईला लखनऊच्या गोलंदाजांनी एकामागून एक धक्के दिले. सलामीवीर रचिन रवींद्रला मोहसिन खानने क्लीन बोल्ड करत गोल्डन डकवर बाद केले. गायकवाड आणि रहाणेने संघाचा डाव सावरला, पण ऋतुराज १७ धावा करत यश ठाकूरच्या चेंडूवर बाद झाला. अजिंक्य रहाणेनी क्रुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर २४ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. तर जडेजा एकटाच मैदानात शेवटपर्यंत पाय रोवून उभा होता.

जडेजाने ४० चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. शिवम दुबे आणि समीर रिझवी यांना चांगली खेळी करणे जमले नाही. तर अनुभवी मोईन अलीने ३ षटकारांच्या हॅटट्रिकसह ३० धावा दिल्या. तर धोनीने अखेरच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडत ९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह २८ धावा केल्या आणि संघाची धावसंख्या १७६ वर नेली. लखनौकडून क्रुणाल पंड्याने सर्वाधिक २ विकेट तर स्टॉयनिस, रवी बिश्नोई, यश ठाकूर आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here