नगर : आयपीएल २०२४ (IPL 2024) रणसंग्रामातील ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Panjab Kings) संघात खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराज च्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने ३ गडी गमावून विजय मिळविला.
नक्की वाचा : टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर;’या’ खेळाडूंना संघात स्थान
पंजाबचा या मोसमातील हा चौथा विजय (CSK vs PBKS )
फिरकीपटूंना अनुकूल अशा खेळपट्टीवर प्रथम खेळून चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १७.५ व्या षटकातच ३ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने ३० चेंडूत ४६ आणि रिली रॉसोने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. तसेच शशांक सिंग २५ धावांवर नाबाद तर सॅम करन २६ धावांवर नाबाद परतला. पंजाबचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. त्याचबरोबर चेन्नई विरुद्धचा हा सलग पाचवा विजय आहे. सीएसकेसाठी शार्दुल ठाकुर, शिवम दुबे आणि पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
अवश्य वाचा : श्रमिकांच्या घामाला दाम मिळो; उत्कर्षा रुपवते यांनी कामगारांना भेटून दिल्या शुभेच्छा
चेन्नईचा खेळ गडबडला (CSK vs PBKS )
प्रथम फलंदाजीस आलेल्या चेन्नईला ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हरप्रीत ब्रारने अजिंक्य रहाणेला बाद करुन मोडली. यानंतर ब्रारने त्याच षटकात शिवम दुबेला बाद केले, खाते न उघडताच पॅव्हेलियन मध्ये परतला. यानंतर राहुल चहर ने जडेजाला बाद केल्याने चेन्नईचा डाव गडगडला. चेन्नईला चांगली सुरुवात करता आली नाही आणि अवघ्या सहा धावांत तीन गडी गमावले. चेन्नई साठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४८ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. धोनीने ११ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे सीएसकेने ७ बाद १६२ धावा केल्या. तर पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.