Cultural festival : नगर : नगर जिल्ह्यात जनसेवा फाउंडेशनच्या (janseva Foundation) वतीने विविध उपक्रम राबविले जातात. जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने जिल्यातील श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड, राहुरी आणि पाथर्डी तालुक्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव (Cultural festival) २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली.
हे देखील वाचा: मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती
बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान (Cultural festival)
या सोहळ्यात विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामधील विजेत्या महिलांना खासदार सुजय विखे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. यामध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही वॉटर प्युरिफायर, सायकल यासह अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले, अभिनेत्री मानसी नाईक, महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल, रोहित माने आणि शिवाली परब उपस्थितांचे मनोरंजन करणार आहेत.
नक्की वाचा: बापरे ! पंतप्रधान मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स ?
महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन (Cultural festival)
राजू आणि प्रशांत अनासपुरे यांच्या यांच्या संकल्पनेतून साकार होणारा सदरील कार्यक्रम हा १ मार्च रोजी श्रीगोंदा येथील बाजारतळ, २ मार्च रोजी शेवगाव येथील खंडोबा मैदान, ३ मार्च रोजी जामखेड येथील जामखेड महाविद्यालय, ४ मार्च रोजी राहुरी येथील केशर मंगल कार्यालय (मल्हारवाडी रोड) आणि ५ मार्च रोजी पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात सादर होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमांची वेळ ही सायंकाळी ६ वाजेची असून समस्त महिला भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची रंगत वाढवावी, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.