Cultural Festival : पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवांतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन

Cultural Festival : पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवांतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन

0
Cultural Festival : पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवांतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन
Cultural Festival : पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवांतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन

Cultural Festival : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या (Janseva Foundation) संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर गौरव दिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे (Cultural Festival) आयोजन २९ ते ३१ मे दरम्यान अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात करण्यात आले आहे. या महोत्सवा अंतर्गत भव्य चित्रकला स्पर्धा आयोजियत करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन वयोगटांमध्ये होणार आहे. २२ मे पर्यंत स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर चित्र जमा करावेत, अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली.

नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी विषय :

आवडते मंदीर, आवडता किल्ला व  पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी प्रस्थापित केलेले शिवलिंग. आठवी ते दहावी गटासाठी विषय: पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील एक प्रसंग व  पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी नदीकिनारी बांधलेला घाट. तसेच खुला, महाविद्यालयीन, व्यावसायिक चित्रकार आणि कला रसिक गटासाठी विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेले शिवमंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकाची तुमची काल्पनिक प्रतिमा. हे विषय देण्यात आले आहेत, चित्रकला स्पर्धेचे संयोजन समितीचे अशोक डोळसे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गटातून १० स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे. 

अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

चित्रकारांना सहभागी होण्याचे आवाहन (Cultural Festival)

या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी चित्र काढण्यासाठी शहरातील विविध भागामधील सेंटर मधून पेपर घेऊन जावा व गुरवार २२ मे पर्यंत जेथून पेपर घेतला आहे. त्याच ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर व कागदावरच घरीच चित्र काढावे. जास्तीत जास्त विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच हौशी व व्यावसायिक चित्रकार यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, आवाहन  जनसेवा फाउंडेशनचे निखील वारे यांनी केले आहे.

स्पर्धकांना चित्रांसाठी पेपर मिळण्याची ठिकाणे पुढील प्रमाणे :

चंदे बेकर्स वडगाव गुप्ता, परफेक्ट टायर्स बोल्हेगाव नागापूर, कोणार्क ट्रेडर्स तपोवन रोड, साई कलेक्शन भिस्तबाग चौक, सूर्यकांत फर्निचर पाईपलाईन रोड, पारिजात कॉर्नर गुलमोहर रोड, लोटस मेडिकल कलानगर चौक, अशोका आर्ट गॅलरी प्रोफेसर कॉलनी चौक, सागर मेडिकल ताराकपूर, शुभम मेडिकल दिल्ली गेट, अक्षय अगरबत्ती डाळ मंडई, सिद्धेश्वर मेडिकल माळीवाडा, डोळसे ऑइल डेपो भुतकरवाडी,  महालक्ष्मी मल्टीस्टेट  बुरुडगाव, जलाराम बेकर्स केडगाव, हराळ हॉस्पिटल जवळील मेडिकल कल्याण रोड, भंडारी मेडिकल भिंगार वेश,  जनकल्याण रक्तपेढी नालेगाव या ठिकाणांहून पेपर सकाळी अकरा ते एक व सायंकाळी चार ते सहा या वेळेत घेऊन जावे. व पुन्हा याच ठिकाणी ते जमा करावे.