Cyber Crime : नगर : वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत (Cyber Crime) अहिल्यानगर पोलीस (Police) दलातर्फे जनजागृती करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, बीडीडीएस, महिला बाल अपराध शाखा, मानव संसाधन, एएचटीयु विभागाच्या वतीने शहरातील कोहिनूर मॉल (Kohinoor Mall) येथे ही जनजागृती करण्यात आली.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
जिल्ह्यात सायबर गुन्ह्याबाबत वाढ
राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सायबर गुन्ह्याबाबत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस दलातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. एटीएम कार्ड, खोटे फोन कॉल्स, एटीएम चा वापर करतांना घ्यावयाची काळजी, सोशल नेटवर्किंग साईटवर होणारी फसवणूक, तसेच बँकेतून मिळालेला वन टाइम पासवर्ड बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
सायबर पोलीस व बीडीडीएस पथकाने केले मार्गदर्शन (Cyber Crime)
सोशल नेटवर्किंग साईटवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका, त्यांच्याशी कोणत्याही व्यक्तिगत माहिती अथवा फोटोची देवाणघेवाण करू नका, कोणताही एसएमएस, एमएमएस, व्हॉटसला उत्तर देऊ नका, ऑनलाईन खरेदीद्वारे होणारी फसवणुकीबाबत सायबर पोलीस व बीडीडीएस विभागाच्या पथकाने मार्गदर्शन केले. यावेळी बीडीडीएसचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे, पोलीस अंमलदार रोहित कांबळे, समीर सय्यद, मतीन पठाण, मनोज करबारे, शरद वर्पे, अंकुश कुलांगे, भजंग बडे, अनिता पवार, अर्चना काळे, तेजश्री दारकुंडे आदी उपस्थित होते.



