Cyber ​​Police : एक कोटी ११ लाखांची फसवणूक करणारे जेरबंद; सायबर पोलिसांची कारवाई 

Cyber ​​Police : एक कोटी ११ लाखांची फसवणूक करणारे जेरबंद; सायबर पोलिसांची कारवाई 

0
Cyber ​​Police : एक कोटी ११ लाखांची फसवणूक करणारे जेरबंद; सायबर पोलिसांची कारवाई 
Cyber ​​Police : एक कोटी ११ लाखांची फसवणूक करणारे जेरबंद; सायबर पोलिसांची कारवाई 

Cyber ​​Police : नगर : शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) पैसे गुंतवणूक केल्यास २० ते ३० टक्के अधिक नफा मिळून देतो, असे म्हणत एक कोटी १० लाख ८० हजारांची फसवणूक (Fraud) करणाऱ्यांना सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. 

नक्की वाचा : अहिल्यानगर मधील तालमींचा इतिहास

२० ते ३० टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष

महावीर दिगंबर कांबळे (रा. गोटेवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर), प्रवीण दत्तू लोंढे (वय ३८ रा. वडवळ स्टॉप, कोळेगाव ता. मोहोळ जि. सोलापूर), शिवाजी साहेबराव साळुंके (वय ४० रा. वडवळ ता. मोहोळ), सागर शंतजय कुलकर्णी (रा. वाणी गल्ली, ता. मोहोळ ता. जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज व्हॉटसअप मोबाईल नंबरहून तक्रारदार यांना शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून २० ते ३० टक्के अधिक नफा मिळवून देतो, असे सांगण्यात आले. यावर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी एक कोटी दहा लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवश्य वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’; शिवराज राक्षेचं वक्तव्य

तांत्रिक विश्लेषणानुसार सापळा रचून आरोपी ताब्यात (Cyber ​​Police)

यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा सोलापूर येथील महावीर कांबळे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोसई योगेश चाहेर, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल हुसळे, निलकंठ कारखेले, अरुण सांगळे, मोहम्मंद शेख, मल्लिकाअर्जुन बनकर, दिगंबर कारखेले, दिपाली घोडके, सविता खताळ, प्रितम गायकवाड यांच्या पथकाने केली. 


याबाबत शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करुन मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. फसवणूक करणारी टोळी परदेशातील असून येथील स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने गरिबांना पैशाची आमिष देऊन त्यांच्याकडुन फसवणुकी करिता करंट अकांऊट ओपन करुन त्यामध्ये ऑनलाईन बँकिग चालू करुन ऑनलाईन बँकेचा ॲक्सेस परदेशात दिला जातो. त्यामुळे परदेशात असलेले मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात अडचणी निर्माण होतात. तरी सायबर पोलीस पोलिसांमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपण मोठ्या रकमेच्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता खात्री करुन योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करावी. तसेच आपल्या नावावर आपल्या कागदपत्राचा वापर करुन कोणी अकाऊंट ओपन करीत असेल अगर सिमकार्ड खरेदी करत असेल त्यापासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.