Cyclone Remal Update: पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळाचा दणका; एक लाख नागरिकांचे स्थलांतर 

रेमल चक्रीवादळ रविवारी (ता.२६) रात्री ८.३० वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. रेमल वादळामुळे लाकडाची किंवा बांबूची घरे उद्ध्वस्त झाली.

0
Cyclone Remal Update
Cyclone Remal Update

नगर : बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळाने (Cyclone Remal) सध्या मोठा कहर केला आहे. हे चक्रीवादळ आज पश्चिम बंगाल (West Bengal) आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. या चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीला बसल्याने या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतोय. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग १०० ते ११० किमी आहे. तसेच अनेक भागात झाडं कोसळली आहेत. उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलंय. यावेळी किनारपट्टी भागातल्या १ लाख १० हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनीही या चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला.  

नक्की वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल  

रेमल वादळामुळे घरे उद्ध्वस्त (Cyclone Remal Update)

रेमल चक्रीवादळ रविवारी (ता.२६) रात्री ८.३० वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. रेमल वादळामुळे लाकडाची किंवा बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडे ही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबन मधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे.  किनाऱ्यालगतचे शेत आणि सखल भाग जलमय झाला आहे. घरांची छत उडाली असून विजेचे खांब तुटलेत. अनेक भागात झाडे उन्मळून पडली. कोलकात्याला लागून असलेल्या सखल भागातील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.

अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले

बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी (Cyclone Remal Update)

भारतीय हवामान विभागाचे  सोमनाथ दत्ता म्हणाले की, दक्षिण बंगालमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव दिसून येईल. वादळाचा तडाखा बसल्यापासून बंगालच्या किनारपट्टीपासून ते कोलकाता पर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे IMD ने ईशान्य भारतातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. चिरांग, गोलपारा, बक्सा, दिमा हासाओ, कचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुबरी, दक्षिण सलमारा, बोंगाईगाव, बजाली, तामूलपुर, बारपेटा, नलबारी, मोरीगाव, नागाव, होजई आणि पश्चिम कार्बी  जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here