DA Hike : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक गुडन्यूज दिली आहे. यावेळी केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन् कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्यात आला आहे. हा महागाई भत्ता दोन टक्के वाढवण्यात (Two percent increase) आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के झाला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे.
नक्की वाचा : धक्कादायक! महाराष्ट्रीयन तरुणीची बंगळुरूत हत्या;सुटकेसमध्ये आढळला मृतदेह
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ (DA Hike)
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२४ मध्ये वाढ झाली होती. तेव्हा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. तेव्हा तीन टक्के वाढ झाली होती. आता दोन टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात अधिक महागाई भत्ता जोडला जाईल. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून प्रभावी मानली जाईल. महागाई भत्त्याच्या वाढीमुळे करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल.
अवश्य वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समावेशक होते’;अजित पवारांनी खोडला संभाजी भिडेंचा दावा
किती पगार वाढणार (DA Hike)
- जर एखाद्याचे मूळ वेतन ५० हजार रुपये असेल, तर ५३% डीएनुसार त्याला २६,५०० रुपये महागाई भत्ता मिळेल. परंतु ५५ टक्के डीएनुसार त्याला २७,५०० रुपये DA मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात एक हजार रुपयांची वाढ होणार आहे.
- जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन ७० हजार रुपये असेल. तर त्याच्या मूळ पगारावर महागाई भत्ता ३७,१०० असेल. परंतु ५५ टक्के डीएनुसार, महागाई भत्ता ३८,५०० असेल. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात १,४०० ने वाढ होईल.
- मूळ वेतन ₹ १,००,००० असलेल्यांना ५३ टक्के डीए दराने ५३,००० रुपये महागाई भत्ता मिळत असे, परंतु आता त्यांना ५५ टक्के दराने ५५,००० रुपये डीए मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात मासिक २ हजार रुपयांची वाढ होणार आहे.