Dada Bhuse : श्रीरामपूर : राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी श्रीरामपुरचे (Srirampur) माजी आमदार भानुदास मुरकुटे (MLA Bhanudas Murkute) यांची अशोक कारखाना कार्यस्थळावर भेट घेत त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ, असे आश्वासन भुसे यांना दिले.
हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
लोकसभा निवडणुकीत मदत करण्याची गळ
याबाबत मुरकुटे यांनी सांगितले की,आज दुपारी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी आपली अशोक कारखाना कार्यस्थळावर भेट घेवून लोकसभा निवडणुकीत मदत करावी, अशी गळ घातली. परंतु आपण आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझा निर्णय तुम्हाला कळवतो, असे मी त्यांना सांगितले.
नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार
मोजक्याच लोकांची उपस्थिती (Dada Bhuse)
या भेटीप्रसंगी मंत्री भुसे यांच्यासमवेत सचिव भाऊ चौधरी व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कारखाना कार्यस्थळ येथे संचालकांची बैठक सुरू होती. संचालकांशी हस्तांदोलन केल्यानंतर मंत्री भुसे यांनी मुरकुटे यांच्या समवेत त्यांच्या दालनात बंद दाराआड चर्चा केली.