Dada Patil College : कर्जत : संस्कृती आणि संस्कार यांचा उत्तम मिलाप लोकसाहित्यामध्ये असतो. संस्कारांचे संस्करण होणे गरजेचे आहे. संस्काराचा परिणाम मनावर होतो. विज्ञानाची कास, संत साहित्याची शिकवण, मराठी संस्कृती, लोकसाहित्य, लोकनाट्य यांचा परिचय शिक्षणामुळे होत आहे. जनमानसातील संस्कृती म्हणजे लोककला (Folk art), लोकसाहित्य (Folk Literature) व लोकसंस्कृती आहे.
भाषा हा लोककला साहित्यातील महत्त्वाचा भाग असून संस्कृतीमध्ये भाषा, कलांचा समावेश होतो. संस्कृती बदलत राहते. ओव्या, अभंग जनमाणसात रुजलेले आहेत. काळानुरूप संस्कृती बदलत राहते. दानव, मानव व देव या सगळ्या माणसाच्या कृती आहेत, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रकार, शिल्पकार, कवी व संशोधक भास्कर हांडे (हॉलंड) यांनी केले. ते दादा पाटील महाविद्यालय (Dada Patil College) आयोजित मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आधुनिक परिस्थितीत लोककला, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती आव्हाने आणि संधी या अंतरराष्ट्रीय परिषदेत (International Conference) बोलत होते.
नक्की वाचा: सुदृढ शरीरातूनच उत्तम प्रशासन घडेल : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
अनेक मान्यवर उपस्थित
या अंतरराष्ट्रीय परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, डॉ. सदानंद भोसले, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. एकनाथ मुंढे, डॉ. सुधाकर शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते. कवी, गीतकार, चित्रपट अभिनेता बाबासाहेब सौदागर यांचा ‘हिरव्या ऋतूंचा रंग महाल लोकगीतांकडून चित्रपट गीतांकडे’ या विषयावरील नांदी सकाळ सत्रात झाली. याप्रसंगी कोपरगावचे छबुराव सुपेकर यांनी ‘वासुदेव आला..’ व शेवगावचे धर्मा कांबळे यांनी ‘किंगरी वादन’ सादर केले. याप्रसंगी लोककला अभ्यासक भगवान राऊत, वगनाट्य लेखक मारुती आखाडे, ज्येष्ठ तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर उपस्थित होते.

अवश्य वाचा: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण: खासदार लंके
यावेळी बोलताना सुधीर लंके म्हणाले की, (Dada Patil College)
लोककला, लोकसाहित्य व लोकसंस्कृती या बंदिस्त होणाऱ्या गोष्टी नाहीत. संस्कृती ही स्मारके व पुतळ्यांवरती मर्यादित नसते. आपली परंपरा व सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला पाहिजे असे युनोस्कोने सांगितलेले आहे. पिंगळा जोशी, वासुदेव यासारख्या लोककलावंतांपुढे अनेक आव्हाने आज उभी राहिलेली आहेत. वर्षानुवर्ष लोककलावंत आपल्या कला सादर करतात परंतु ते प्रसिद्धीला येत नाहीत.
हे देखील वाचा : जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम
आजच्या काळामध्ये ‘इंडियन आयडॉल’ नावाच्या प्रसिद्धी माध्यमातून मात्र एखादा कलावंत तात्काळ प्रसिद्ध होताना दिसतो आहे. आज सांस्कृतिक राजकारण वाढलेले आहे. त्याचा वापर सत्ताधारी करत असल्याचे निदर्शनास येते. लोककला लोकसंस्कृतीचा चुकीचा वापर राजकारणामध्ये होत असल्याचे दिसते. लोक कलावंत व लोकसाहित्याला सेन्सॉरशिप मान्य नाही मात्र लोकांच्या हातातच त्यांची सेन्सॉरशिप हवी असे मत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक डॉ. संदीप पै यांनी तर सूत्रसंचालन प्रा. राम काळे यांनी केले.



