Dada Patil College : तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे :  डॉ संजय नगरकर 

Dada Patil College : तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे : डॉ संजय नगरकर

0
Dada Patil College : तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे :  डॉ संजय नगरकर 
Dada Patil College : तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे :  डॉ संजय नगरकर 

Dada Patil College : कर्जत : महाराष्ट्राच्या मातीमधील लोककलेच्या (Folk Art) विविध अविष्कारांनी इथल्या माणसांच्या मनाचे आणि मेंदूचे हजारो वर्षांपासून भरण पोषण केलेले आहे. संत एकनाथ महाराजांपासून (Sant Eknath Maharaj) ते अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या पर्यंत भारुडे, गोंधळी, वासुदेव, पिंगळा, वगनाट्य भराडी अशा वेगवेगळ्या लोककलांनी मनोरंजनाबरोबरच सामाजिक प्रबोधनाची व्यापक परंपरा येथे निर्माण केली आहे. परंतु यंत्र आणि तंत्र युगानंतर नवी पिढी बेंगळी कलांची भक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन तर आजही हिणकस आहे. तो बदलण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे मत दादा पाटील महाविद्यालयाचे (Dada Patil College) प्राचार्य डॉ संजय नगरकर (Dr. Sanjay Nagarkar) यांनी केले. ते सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात तमाशा प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी संभाजीनगर येथील लोककलावंत दलितमित्र भास्कर (आबा) राऊत, जेष्ठ पत्रकार प्रकाश पाटील, ज्येष्ठ तमाशा कलावंत हसनभाई पाटेकर, लोककलेचे अभ्यासक भगवान राऊत यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

नक्की वाचा : पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध : आमदार खताळ

युनोस्कोने लोककलेला केंद्रस्थानी अधिष्ठान दिल्याची घोषणा

यावेळी पुढे बोलताना प्राचार्य नगरकर म्हणाले की, नुकतेच युनोस्कोने लोककलेला केंद्रस्थानी अधिष्ठान दिल्याची घोषणा केली. त्याचा निश्चितच तमाशासारख्या लोककलांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होण्यास उपयोग होईल. तमाशासारख्या लोककलेच्या संदर्भात काही चित्रपटांमधून दाखविल्या गेलेल्या कथांमुळे तमाशासारख्या लोककलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हिणकस झाला. परंतु तमाशामध्ये असलेल्या गण गवळण बतावणी वगनाट्य यामधून खूप मोठे सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन करण्याची क्षमता आहे. तमाशा हा मराठी माणसाचा प्राण आहे. तो जपण्याची व जोपासण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. प्रकाश पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील उपेक्षित व वंचित घटकांनी खऱ्या अर्थाने इथल्या लोककलेचे संरक्षण केले आहे. सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये शिकविल्या गेलेल्या बाबी प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्षात आणाव्यात असे आवाहन  केले. 

अवश्य वाचा : इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा

मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान (Dada Patil College)

५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या दहा दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या विविध नामांकित कलावंतांनी तबलावादन, गण गवळण बतावणी वगनाट्य अभिनय पटकथा लेखन अशा विविध बारीक-सारीक बाबींचे प्रशिक्षण दलित मित्र पुरस्कार विजेते भास्कर आबा जाधव, मारुती आखाडे(कोर्टी), वसंत चव्हाण(कोर्टी), मुरली शिंदे (मोरगाव ता.वाळवा), दिनकर पठारे( वैजापूर), चंद्रकांत शिंदे(कापरेवाडी), रेखा चव्हाण (कोरेगाव), शिवकन्या चव्हाण (संगमनेर), संदीप पंचराज(आंबेगाव) या नाट्य कलाकारांनी प्रशिक्षण दिले. या सर्व प्रशिक्षणार्थींना शिबिराची प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच प्रशिक्षणार्थींनी या सर्व प्रकारांचे सादरीकरण महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांतर्गत केले. समारोप समारंभाची अखेर वगनाट्याने झाली.

हे वाचा : अपयशाने न खचता स्पर्धेत जो टीकतो तोच खरा विद्यार्थी :  गिरीश महाजन

तमाशा प्रशिक्षणासाठी महाविद्यालयीन तरुणांची हजेरी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हसनभाई पाटेकर यांनी केले तर आभार भगवान राऊत यांनी मानले. दहा दिवसीय तमाशा प्रशिक्षणासाठी महाविद्यालयीन तरुणांनी हजेरी लावली होती. यात दहा दिवस गण-गवळण, मराठी हिंदी सदाबहार गाणी, हार्मोनियम पेटी, ढोलकी यासह वग आणि त्यातील अदाकारी शिकविण्यात आली होती. या प्रशिक्षणात साक्षी काळे, पायल पोकळे, स्वराली सोनवणे, कोमल जाधव आणि पौर्णिमा घोडके पाच महाविद्यालयीन तरुणी देखील सहभागी झाल्या होत्या. तर राजू इंगळे, सुमित काकडे, प्रशांत तुपे, नंदलाल कदम, अनिकेत सूर्यवंशी, ओमकार मुरकुटे, यश खेतमाळस, प्रकाश शिंदे, राहुल भोसले, राम कानगुडे,  प्रेम थोरात, यश थोरात, राहुल लोंढे, कृष्णा ढेपले, प्रवीण भोगे तरुण विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.