Dam affected : धरणग्रस्त कुटुंबाने मागितले इच्छामरण

Dam affected : धरणग्रस्त कुटुंबाने मागितले इच्छामरण

0
Dam affected : धरणग्रस्त कुटुंबाने मागितले इच्छामरण
Dam affected : धरणग्रस्त कुटुंबाने मागितले इच्छामरण

Dam affected : नेवासा : जायकवाडी (नाथसागर) धरणासाठी सर्वस्व गमावल्याला (Dam affected) ५० वर्षांवर कालावधी उलटूनही पुनर्वसन प्रक्रियेत सामावून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या नैराश्यातून शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणास (Fasting to death) बसणार असलेल्या खरवंडी येथील खर्डे कुटुंबाने थेट इच्छामरणाची (Euthanasia) परवानगी मागितली आहे. या घटनेतून राज्य सरकारच्या (State Govt) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हे देखील वाचा : ऑनलाईन प्रेमात अडकलेल्या मुली कोतवाली पोलिसांनी आणल्या परत


खरवंडी (ता.नेवासा) येथील पुनर्वसनापासून वंचित धरणग्रस्त रेवणनाथ नामदेव खर्डे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन राज्य शासनाच्या अनास्थेमुळे त्यांच्या कुटुंबाच्या झालेल्या वाताहतीची नुकसान भरपाई मिळण्यासह नियमानुसार पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. याबाबत गेली वर्षानुवर्षे पाठपुरावा करुनही कागदी घोडे नाचविण्यापलिकडे ठोस कार्यवाही होत नसल्याने येत्या २१ डिसेंबर पासून खरवंडीच्या खळवाडी परिसरातील मारुती मंदीरात कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद करुन राज्य सरकार अजूनही याप्रश्नी सकारात्मक नसल्यास संपूर्ण कुटुंबाला इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा : कालव्‍यांची कामे रखडवून कोणती ‘निर्मिती’ साध्‍य करायची होती : राधाकृष्‍ण विखे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here