Dattatray Bharane : दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊ; कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती

Dattatray Bharane : दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊ; कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती

0
Dattatray Bharane : दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊ; कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती
Dattatray Bharane : दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊ; कृषिमंत्री दत्ता भरणेंची माहिती

Dattatray Bharane : पाथर्डी : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) महापूर आला शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. राज्यातील महायुतीचे सरकार (Mahayuti Government) शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पाच लाख ८९ हजार एकर क्षेत्राचे नुकसान झाले असुन पंचनामे झाल्याचा अहवाल येताच दिपावली अगोदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे (Dattatray Bharane) यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची कृषिमंत्र्यांकडे विनंती

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, करंजी येथील नुकसानग्रस्त भागाची कृषिमंत्री भरणे यांनी पाहणी केली. करंजी येथील किसन दानवे, बबन दानवे यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी करताना आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, कृषी अधीक्षक तसेच तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक व महायुतीचे पदाधिकारी शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार कर्डिले यांनी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची कृषी मंत्र्यांना सविस्तर माहिती देत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत करण्याची देखील विनंती कृषिमंत्र्यांकडे केली.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

यावेळी कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले, (Dattatray Bharane)

धीर धरा सरकार तुमच्या पाठिशी आहे. आम्ही देखील शेतकऱ्याची मुल आहोत. शेतकऱ्याला मदत करण आमची प्रामाणिक भूमिका आहे. शेतकरी दुखी आहे आम्ही त्यांच्या दुखात सहभागी आहोत. गुंठाभर नुकसान झालं असेल तरीही सरकार मदत देण्यास तयार असल्याचे कृषिमंत्री म्हणाले. अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांचे ७७ हजार हेक्टरचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी यावेळी दिली. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मणियार, संभाजी पालवे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे,सुनील परदेशी, शिक्षकनेते विजय अकोलकर, सरपंच रफिक शेख यांच्यासह कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी या पाहणी दरम्यान उपस्थित होते.