Daya Dongre Passes Away: मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

0
Daya Dongre Passes Away: मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
Daya Dongre Passes Away: मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

नगर : मराठी चित्रपटसृष्टीतील(Marathi Film Industry) ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे (Daya Dongre) यांचे आज निधन (Passes Away) झालं आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांनी कजाग सासू म्हणून मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता. त्यांच्या निधनामुळे मात्र मराठी चित्रपटसृष्टीवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा: ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणाऱ्या सिमरने वेधलं बॉलिवूडचं लक्ष

१९४० साली जन्मलेल्या डोंगरे यांना अभिनयाची गोडी शालेय जीवनातच लागली होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची सुरुवात केली. पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचं शिक्षण घेतलं. त्यांच्या आई यमुताई मोडक या नाट्यअभिनेत्री, आत्या शांता मोडक या गायिका आणि पणजोबा कीर्तनकार असल्याने कलेचा वारसा दया डोंगरे यांना पिढीजात लाभला होता. लग्नानंतरही पती शरद डोंगरे यांच्या पाठिंब्याने त्यांनी कलाक्षेत्रात काम सुरू ठेवलं.

अवश्य वाचा: आई-मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘उत्तर’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

दया डोंगरे यांची कारकिर्द (Daya Dongre Passes Away)

‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची’, आणि ‘कुलदीपक’ यांसारख्या चित्रपटांत त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे, त्यांनी ‘चार दिवस सासूचे’ या लोकप्रिय मालिकेतही काम केले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी साकारलेली ‘खाष्ट आणि कजाग सासू’ ची व्यक्तिरेखा विशेष गाजली, ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाला.

मराठी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत (Daya Dongre Passes Away)

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि भूमिकेत जीव ओतून काम करण्याच्या शैलीमुळे दया डोंगरे यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले होते. १९९० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला,   मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या निधनाने एका चांगल्या अभिनेत्रीला कलाविश्वाने गमावले आहे.