DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएलमध्ये दुसरा विजय;जेक फ्रेझर मॅकगर्क ठरला गेमचेंजर

आयपीएल २०२४ मधील २६ वा सामना शुक्रवार (ता.१२) लखनऊ येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सवर ६ विकेट्सनी विजय मिळवला.

0
DC vs LSG
DC vs LSG

नगर : आयपीएल २०२४ (IPL 2024) मधील २६ वा सामना शुक्रवार (ता.१२) लखनऊ येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) लखनऊ सुपरजायंट्सवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने आयुष बडोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात दिल्लीने पदार्पणवीर जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ गडी गमावून विजय मिळविला.

नक्की वाचा : नगर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणार; सुजय विखे पाटलांचे आश्वासन

नवख्या जेक फ्रेजर मॅक गर्क ठरला गेमचेंजर (DC vs LSG)

xr:d:DAFvzVEvC2U:1577,j:6237910201020643259,t:24041307

१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण डेव्हिड वॉर्नर केवळ ८ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर पृथ्वी शॉने जबाबदारी स्वीकारली, पण मागील सामन्या प्रमाणे त्याला अर्धशतक झळकावता आले नाही. तो २२ चेंडूत ३२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीने पूर्वार्धात अतिशय संथ फलंदाजी केली, मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि नवोदित जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. एकीकडे पंतने २४ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तर मॅकगर्कने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ५ षटकारही मारले.

अवश्य वाचा : नगर शहरात पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्याची घटना गंभीर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दिल्लीच्या माऱ्यापुढे लखनऊचा पराभव (DC vs LSG)

पंत आणि मॅकगर्क यांच्यात ७७ धावांची भागीदारी झाली. दिल्लीला २ षटकात फक्त १० धावा हव्या होत्या. त्यावेळी शाई होप आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी घाई न करता ११ चेंडू शिल्लक असताना दिल्लीचा ६ गडी राखून विजय मिळवून दिला. लखनऊकडून रवी बिश्नोईने दोन तर नवीन-उल-हक आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लखनौ आणि दिल्ली यांच्यातील या सामन्यात युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. या सामन्यात लखनऊने अवघ्या ७४ धावांत ७ विकेट्स गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर आयुष बडोनीने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या आणि अर्शद खाननेही १६ चेंडूत २० धावा करत लखनौला १६७ धावांपर्यंत पोहोचवले होते. मात्र दिल्लीच्या माऱ्यापुढे लखनऊला हार स्वीकारावी लागली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here