Dead : अकोले : तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील चिंचखांड घाटात अगस्ति कारखान्यास ऊस (Agasti Sahakari Sakhar Kharkhana) वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एकजण जागीच ठार (Dead) तर दोघे गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याची दुदैवी घटना सोमवारी रात्री घडली.
नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
ऊस घेऊन अगस्ति कारखान्याकडे जातांना अपघात
याबाबतची अधिक माहिती अशी, सोमवारी (ता.10) रात्री 12 वाजेच्या सुमारास ऊस घेऊन अगस्ति कारखान्याकडे जात असताना घाटात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये धुडकू कथा अहिरे (वय 20, रा. खरडे, ता. चाळीसगाव) हा जागीच ठार झाला आहे, तर उखा रतन मोरे (रा. पिंपरखेड, चाळीसगाव) याच्यासह अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील जखमींवर अकोलेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ नामदेव कोंडिबा गावंडे हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले.
अवश्य वाचा : भरदिवसा ट्रक चालकाचा गळा कापला; दोघे आरोपी जेरबंद
अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद (Dead)
या घटनेची माहिती कारखाना प्रशासनाला समजताच कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर व कार्यकारी संचालक सुधाकर कापडणीस यांनी तातडीने शेतकी अधिकारी सतीष देशमुख, संजय राठोड, नथू राठोड, खंडू आवारी, संपत चौधरी, पप्पू नाईकवाडी यांना घटनास्थळी पाठवून मदत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस कर्मचारी महेंद्र गुंजाळ, संदीप भोसले, रोहिदास पावसे, सोमनाथ पटेकर, रुग्णवाहिकाचालक गणेश हासे, बिरबल वाकचौरे, दोन जेसीबी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केले. रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्याला अडथळा निर्माण होत होता. मंगळवारी पहाटेपर्यंत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत.