Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला

Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला

0
Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला
Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला

Dead Body : श्रीगोंदा : तालुक्यातील दानेवाडी परिसरात शीर, दोन्ही हात आणि एक पाय नसलेला तरुणाचा मृतदेह (Dead Body) पोत्यात बांधलेल्या स्थितीत विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुरुष मृतदेहाचे शीर नसल्याने बेलवंडी पोलिसांसमोर (Police) तपासाचे मोठे आव्हान आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत बेलवंडी पोलिसांना तपासाच्या (Investigation) सूचना दिल्या.

अवश्य वाचा : खोक्या भोसलेला प्रयागराज न्यायालयात का हजर करणार?

Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला
Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला

साधारणपणे २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरात साधारणपणे २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणाचा सडलेला तसेच शीर, दोन्ही हात आणि एक पाय नसलेला मृतदेह विहिरीत सापडला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला. तरुणाच्या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे शीर तसेच पाय आणि हात तोडून फेकून देण्यात आले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मृतदेह सापडल्यानंतर सायंकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकलेली नव्हती.

Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला
Dead Body : शीर, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेला मृतदेह आढळला

नक्की वाचा : ‘सुरेश धस यांना समज द्या’;पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी

७ ते ८ दिवसांपूर्वी या तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज (Dead Body)

आजूबाजूच्या परिसरातून बेपत्ता झालेल्यांची माहिती मागवली जात आहे. मृतदेह सडल्यामुळे त्याच्या शरीरावर कोणतेही निशाण सापडत नाहीत. त्याशिवाय हात, पाय तसेच शीर का कापले ? याचा तपास केला जात आहे. त्यासाठी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, यानंतर नेमकी बाब समोर येईल. या घटनेमुळे दानेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरुणाचा निर्घृण खून कुणी आणि कशासाठी केला, याचा तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करीत आहेत. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.