Dead Body : हातावरील गोंदणाणे पटली मृतदेहाची ओळख

Dead Body : हातावरील गोंदणाणे पटली मृतदेहाची ओळख

0
Dead Body : हातावरील गोंदणाणे पटली मृतदेहाची ओळख
Dead Body : हातावरील गोंदणाणे पटली मृतदेहाची ओळख

Dead Body : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील वांबोरी (Vambori) व डोंगरगण हद्दीत असलेल्या वांबोरी घाट परिसरात खताच्या गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहाची (Dead Body) अखेर ओळख पटली असून तो राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे यांचा असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) दिली आहे. दरम्यान, कवाणे यांच्या मृतदेहावर बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवश्य वाचा : उद्योजकाकडून खंडणी मागणारा जेरबंद; MIDC पोलिसांची कारवाई

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दरीत फेकल्याची शक्यता

मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजता डोंगरगण येथील काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी घाट परिसरात गेले असता पहिल्या वळणाजवळील खोल दरीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता खताच्या गोणीत बांधलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला. संबंधित इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटातील दरीत फेकण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

मृतदेहाची टाकळीमिया येथील किरण कवाणे चा (Dead Body)

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनीही पाहणी केली असून फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मृतदेहाच्या हातावर ‘के.के.’ व ‘सोनल’ असे गोंदलेले असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यावरून तपास सुरू केला तसेच सोशल मीडियावरून आवाहन केले. बुधवारी मृतदेहाची ओळख टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे अशी पटली.

कवाणे यांची हत्या नेमकी कोणी केली आणि मृतदेह एवढ्या लांब कोणी आणून टाकला, याबाबत पोलीस सखोल तपास करत असून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान एमआयडीसी पोलिसांसमोर आहे.