Deadly Attack : नगर : श्रीगोंदा आगारातील एसटी वाहक (ST Conductor) मानसिंग गोरे यांच्यावर बेलवंडी फाटा ते गव्हाणवाडी दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला (Deadly Attack) झाल्याची घटना घडली. ‘गाडी ओव्हरटेक का केली?’ या किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये (Baiting) गोरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नक्की वाचा : महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
पोलीस अधीक्षकांना देण्यात आले निवेदन
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भंडारी हे तपासामध्ये जाणीवपूर्वक कसूर करत असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तीन आठवड्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. मात्र, त्या प्रकरणात आजवर ठोस कारवाई झालेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
अवश्य वाचा: अकोले तालुक्याचे ‘अगस्तिनगर’ नामांतर करा : सदगीर
आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी (Deadly Attack)
गोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करून सखोल चौकशी करावी व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ, युवक तालुका महासचिव महेश पवार, रुपेश काळेवाघ, जितेंद्र गायकवाड, सनी कांबळे, मिलिंद शिंदे, विकास ठोंबे आदी उपस्थित होते.