Death : विद्युत तारेच्या कंपाऊंडने घेतला शेतकऱ्याचा बळी; अहिल्यानगर तालुक्यातील घटना

Death : विद्युत तारेच्या कंपाऊंडने घेतला शेतकऱ्याचा बळी; अहिल्यानगर तालुक्यातील घटना

0
Death : विद्युत तारेच्या कंपाऊंडने घेतला शेतकऱ्याचा बळी; अहिल्यानगर तालुक्यातील घटना
Death : विद्युत तारेच्या कंपाऊंडने घेतला शेतकऱ्याचा बळी; अहिल्यानगर तालुक्यातील घटना

Death : नगर : शेतात रानडुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी लावलेल्या तारेच्या कंपाऊंडमधील विजेच्या धक्क्याने (Electric Shock) एका ६८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी (ता. ७) पिंपळगाव लांडगा शिवारात घडली. याप्रकरणी शेतमालकावर गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावणाऱ्याला तत्काळ अटक करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

परवानगी न घेता थेट विजेचा प्रवाह

या घटनेत बारकु धर्मा लांडगे (वय ६८, रा. पिंपळगाव लांडगा, ता. जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पुत्र अंबादास बारकु लांडगे (वय ४०) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी अंबादास लांडगे यांचे वडील बारकु लांडगे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेताकडे जात होते. वाटेत संतोष प्रल्हाद लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा) याचे शेत लागते. संतोष याने आपल्या मक्याच्या शेतात रानडुकरांचा शिरकाव होऊ नये, यासाठी तारेचे कंपाऊंड केले होते. मात्र, यासाठी त्याने कोणतीही परवानगी न घेता थेट विजेचा प्रवाह या तारेमध्ये सोडला होता.

नक्की वाचा : पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं;एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

विजेचा तीव्र धक्का बसल्याने जागीच मृत्यू (Death)

बारकु लांडगे हे शेताच्या कडेने जात असताना त्यांचा नकळतपणे या विद्युत तारेला स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे संबधिताने  निष्काळजीपणा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.