Death : नेवासा: तालुक्यातील वाकडी येथे मंगळवारी (ता.९) सायंकाळच्या सुमारास एका विहिरीत पडलेली मांजर बाहेर काढण्यास गेलेली एक व्यक्ती गुदमरून बुडाली. बुडणाऱ्या व्यक्तीस (Drowning person) वाचविण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांचा देखील मृत्यू (Death) झाला आहे. दम कोंडून व शेणाच्या गाळात फसून या पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे.
हे देखील वाचा: ‘वाघाची शेळी झाली’; माेदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका
विजय माणिक काळे बेशुद्ध अवस्थेत (Death)
माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब पवार असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहे. तर या घटनेमध्ये विजय माणिक काळे ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आहे. या व्यक्तीला तातडीने नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
नक्की वाचा: नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात;उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक
पाडव्याच्या दिवशीच गावावर शोककळा (Death)
याबाबत अधिक माहिती अशी, वाकडी या गावात येथील एका शेतकऱ्याने बायोगॅसची शेनाची स्लरी एका जुन्या विहिरीत सोडली होती. मंगळवारी सायंकाळी या विहिरीत एक मांजर पडले. मांजरीचा जीव वाचवण्यासाठी बबलू अनिल काळे हा तेथे गेला व विहिरीत पडला, मात्र स्लरी खोलवर असल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्यासाठी अनिल काळे यांनी विहीरीत उडी मारली. मात्र, तेही बुडू लागल्याने यांना वाचविण्यासाठी माणिक काळे यांनी व त्यांच्या पाठोपाठ संदीप काळे, बाबासाहेब पवार यांनीही उडी मारली. सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून विजय काळे यांनी पायाला दोर बांधला व नंतर विहिरीत उडी मारली. परंतु तेही बुडायला लागले. हा प्रकार ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी दोरच्या मदतीने त्यांना बुडण्यापासून वाचविले. मात्र, या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.
स्लरी विहिरित सोड़नारा शेतकरी त्याच्या वर कारवाई करा.