Death : संगमनेर : शेततळ्यात बुडाल्याने तीन शाळकरी मुलींचा मृत्यू (Death) झाल्याची घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील मेंढवण शिवारात घडली. या तीनही मैत्रिणी सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध (Search) घेताना ही घटना उघडकीस आली. अनुष्का सोमनाथ बढे (वय ११), सृष्टी उत्तम डापसे (वय १३) व वैष्णवी अरुण जाधव (वय १२) अशी त्यांची नावे आहेत.
अवश्य वाचा : ‘नेत्याला पक्षात घेऊन संपवणं ही भाजपची परंपरा’- विजय वडेट्टीवार
खोलगट भागात जाऊन शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू
शाळा सुटल्यानंतर या मुली घरी आल्या होत्या. जेवण केल्यानंतर या तीनही मुली सोमनाथ काशिनाथ बढे यांच्या गट नंबर ५४ मधील काम सुरु असलेल्या अर्धवट शेततळ्याकडे खेळण्यासाठी गेल्या असाव्यात. या शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते. या पाण्यात खेळण्यासाठी मुली उतरल्या असता, खोलगट भागात जाऊन त्यांचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
नक्की वाचा : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी
संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव (Death)
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.