Death : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

Death : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन ५० जणांचा मृत्यू

0
Death : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन ५० जणांचा मृत्यू
Death : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन ५० जणांचा मृत्यू

Death : नगर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरीची (Stampede) घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू (Death) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. तसेच पुरुषांसह तीन चिमुकल्यांचादेखील यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Death : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन ५० जणांचा मृत्यू
Death : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन ५० जणांचा मृत्यू

अचानक झाली चेंगराचेंगरी

मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमीही झाले आहेत. शवविच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत.

हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी (Death)

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या ठिकाणी बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here