Death : शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

Death : शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

0
Death : शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
Death : शिर्डीतील चार भिक्षुकांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

Death : नगर : शिर्डी (Shirdi) येथून ताब्यात घेतलेल्या भिक्षुकी (बेघर) (Beggar) यांना विसापूर येथील भिक्षेकरीगृहात ठेवण्यात आले होते. त्यातील १० जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना तेथील वैद्यकीय अधिकारी तुरुकमारे यांनी उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात (Ahilyanagar District Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा दोनच दिवसांत मृत्यू (Death) झाला आहे. त्यातील एक जण काल (ता. ७) तर तीन जणांचा आज (ता. ८) मृत्यू झाला आहे. तीन जण पसार झाल्याचे समजते. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. एकाच दिवसात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना तीन लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस

शिर्डी येथून ४९ भिक्षुकांना विसापूर येथील भिक्षेकरीगृहात दाखल

मागील महिन्यापासून शिर्डी येथील भिक्षुकी (बेघर) यांची पोलीस प्रशासनाकडून धरपकड सुरू आहे. त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करण्यात येते आहे. मागील चार दिवसांपूर्वी शिर्डी येथून ४९ भिक्षुकांना विसापूर येथील भिक्षेकरीगृहात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी (ता. ५) रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार

काल एकाचा तर आज तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death)

त्यावेळी सात जणांची प्रकृती चिंताजनक झाल्याने वैद्यकीय अधिकारी तुरुमकर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यातील एकाचा सोमवारी (ता. ७) तारखेला मृत्यू झाला. तर आज (ता. ८) रोजी तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये अशोक मन्साराम बोरसे (वय ३५), सारंगधर मधुकर वाघमारे (वय ४८, रा. राहाता), प्रवीण अण्णा घोरपडे (वय ४८), इस्सार अब्दुल शेख (३८) असे मयत व्यक्तींची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्रिसदस्य चौकशी समिती नेमली आहे.