Death : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना 

Death : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना 

0
Death : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना 
Death : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना 

Death : पाथर्डी : तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील सुशांत कंसराज भवार (वय १७) हा तरुण जनावरे चारण्यासाठी शेताकडे गेला असता जवळच असलेल्या एका विहिरीतून जनावरांसाठी पाणी काढत असताना विहिरीत पडून या तरुणाचा मृत्यू (Death) झाला. ही घटना सोमवारी (ता.२३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 

अवश्य वाचा : वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे

मृतदेह बाहेर काढणे ग्रामस्थांसाठी अशक्य

अहिल्यानगर येथे आयटीआयमधे प्रशिक्षण घेत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने भवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विहिरीत ५० ते ६० फुटापर्यंत पाणी असल्यामुळे सुशांतचा मृतदेह बाहेर काढणे ग्रामस्थांसाठी अशक्य होते. गावातील ग्रामस्थांनी तत्काळ आमदार मोनिका राजळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन पथक अहिल्यानगर तसेच पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशमनला तात्काळ बोलावले.

Death : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना 
Death : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना 

नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

भवार कुटुंबियासह उपस्थित महिला भगिनींना अश्रू अनावर (Death)

त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने विहीरीत गळ टाकून सुशांतचा मृतदेह बाहेर काढला. सुमारे एक तास हे रेस्क्यू सुरू होते. सुशांतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मात्र भवार कुटुंबियासह उपस्थित अनेक महिला भगिनींना अश्रू अनावर झाले. यावेळी मंडल अधिकारी सीमा देठे, तलाठी अमोल कचरे यांच्यासह करंजीचे पोलीस, महावितरणचे कर्मचारी देखील मदतीसाठी उपस्थित होते. पाथर्डी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सुशांत भवारचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.