Death by Drowning : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील नांदगाव परिसरात शेत तलावात (Farm Pond) पाय घसरून पडलेल्या तरुणाचा मृत्यू (Death by Drowning) झाल्याची घटना समोर आली आहे. शिरोमणी अनिल जाधव (वय २३, रा. नांदगाव, ता.नगर) असे या मयत तरुणाचे नाव आहे.
बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडाला (Death by Drowning)
शिरोमणी जाधव हा सकाळी ९ च्या सुमारास कोळपे आखाडा येथील शिंदे यांच्या तलावात पाय घसरून पडला. त्याला बाहेर निघता न आल्याने तो पाण्यात बुडाला. काही वेळाने ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला तळ्याच्या बाहेर काढले. त्याला बेशुद्धावस्थेत त्याचे नातेवाईक किसन जाधव यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



