Death Threat : जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

Death Threat : जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
Death Threat : जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन
Death Threat : जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; पोलीस अधीक्षकांना निवेदन

Death Threat : नगर : पत्रकारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देणाऱ्यावर कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत (Journalist Protection Act) संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातील पत्रकारांच्या (Journalist) वतीने करण्यात आली आहे. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता.१३) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

भांडण सोडवण्यास गेलेल्या पत्रकारास शिवीगाळ व धक्काबुक्की

शहरातील राज चेंबर्स कोठला येथे शनिवारी (ता.९) गणेश उरमुरे (रा. केडगाव) या व्यक्तीला बाबासाहेब बलभीम सानप (रा. वसंत टेकडी) याने लघुशंका केल्याच्या शुल्लक कारणासाठी मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्रकार अन्सार सय्यद व त्यांच्या मुलाला सानप याने शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी काही अनोळखी लोक जमा करून दहशत निर्माण करीत जमाबंदीच्या आदेशाचे देखील उल्लंघन केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

सदर व्यक्तीकडून धोका (Death Threat)

पत्रकार सय्यद यांना धमकावून पुढचा नंबर तुझाच असल्याच्या प्रकारची धमकी दिली. यामुळे सय्यद यांच्या जीविताला सदर व्यक्तीकडून धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिरीष कुलकर्णी, अण्णासाहेब नवथर, सुदाम देशमुख, सुभाष चिंधे, मिलिंद देखणे, सुधीर पवार, श्रीनिवास सामल, संजयकुमार पाठक, निलेश आगरकर, शुभम पाचरणे, संजय सावंत, स्वामी गोसावी, अन्सार सय्यद, शब्बीर सय्यद, उदय जोशी आदींसह पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार उपस्थित होते.