Death threats : जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

Death threats : जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

0
Death threats : जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 
Death threats : जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

Death threats : नगर : सावेडी उपनगरात राहत असलेल्या तरूण-तरूणीमध्ये झालेल्या वादातून तरूणीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी (Death threats) दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

पीडित तरूणीने दिली फिर्याद

याबाबत सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता, कजबे वस्ती येथे राहत असलेल्या ३० वर्षीय पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. गणेश चितळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नालेगाव, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

गणेश चितळे विरोधात गुन्हा दाखल (Death threats)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चितळे याच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गणेशने फिर्यादीला वारंवार फोन करून शिवीगाळ केली तसेच मी तुला बघून घेईन, अशा स्वरूपाची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, पीडितेने घडलेला प्रकार तोफखाना पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गणेश चितळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण या करीत आहेत.