
Deenamitrakar Mukundrao Patil : नेवासा: तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील (Deenamitrakar Mukundrao Patil) स्मारक समितीतर्फे दिले जाणारे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग (Pandurang Abhang) यांनी दिली.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
१९९५ पासून दरवर्षी दिले जातात पुरस्कार
तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीतर्फे १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. मंगळवारी (ता.२) स्मारक समितीच्या सभागृहात या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे व सचिव उत्तमराव पाटील यांनी केली.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार : (Deenamitrakar Mukundrao Patil)
विश्वास श्यामराव पाटील (संपादक, कोल्हापूर), साहित्य: रवींद्र रेखा गुरव, कोल्हापूर (कादंबरी बे दुणे शून्य), माधव जाधव, नांदेड (कथा: आमचं मत आम्हालाच), धनाजी धोंडिराम घोरपडे, सांगली (कविता : जामिनावर सुटलेला काळा घोडा), गजानन इंदुशंकर देशमुख, अमरावती (चरित्र : सबकु सलाम बोलो), संजय बोरुडे, अहिल्यानगर (ललित गद्य : लोकधन), प्रभाकर गायकवाड, परभणी (वैचारिक : मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण), राजेंद्र सलालकर, अहिल्यानगर (समीक्षा तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण). विशेष पुरस्कार : सचिन वसंत पाटील, सांगली (मायबोली रंग कथांचे). ग्रंथनिवड प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. महेबूब सय्यद या निवड समितीने केली.


