Delhi Airport: दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

0
Delhi Airport: दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Delhi Airport: दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नगर : दिल्ली विमानतळाच्या (Delhi Airport) टर्मिनल १ वर एका प्रवाशाला मारहाण (Passenger assaulted) केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी प्रवाशाने आरोप केला की, ड्युटीवर नसलेल्या एका पायलटने हल्ला (The pilot attacked) केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. या घटनेनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या प्रकरणी संबंधित पायलटवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा:  राज्यात थंडीचा कडाका वाढला;अहिल्यानगरमध्ये पारा ६ अंशावर

प्रवाशाने काय आरोप केलेत? (Delhi Airport)

पीडित प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका वैमानिकाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ वर माझ्यावर हल्ला केला. मला आणि माझ्या कुटुंबाला कर्मचाऱ्यांनी सुरक्षा तपासणीसाठी पीआरएम चेक वापरण्यास सांगितले होते. तेव्हा माझ्यासमोर काही जण रांगेत आले. तेव्हा मला या पायलटने विचारलं की, तुम्ही अशिक्षित आहेत का? त्यानंतर शा‍ब्दिक वाद वाढला आणि पायलटने माझ्यावर हल्ला केला”,असा आरोप पीडित प्रवाशाने केला आहे. “या हल्ल्यात मी जखमी झालो आणि रक्तस्त्राव झाला. त्या पायलटच्या शर्टला देखील रक्त लागलं आहे.

अवश्य वाचा: मोठी बातमी!माणिकराव कोकाटेंना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर
माझ्या सात वर्षांच्या मुलीसमोर माझ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. हे पाहून माझी मुलगी अजूनही धक्क्यात आहे. तिला हल्ल्याबाबत भिती वाटत आहे”, असे आरोप देखील या प्रवाशाने केले आहेत. तसेच विमान कर्मचाऱ्यांचे असे वर्तन योग्य आहे का ? असा सवालही त्यांनी विचारला आहे. मला काय करावं हे कळत नाही. डीजीसीए आणि एअर इंडिया अशा वैमानिकांना उड्डाण करण्याची परवानगी कशी देऊ शकतात?”,असं त्यांनी म्हटलं आहे.

एअर इंडियाने निवेदनात काय म्हटलं? (Delhi Airport)

पायलटच्या वर्तनाबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त करत अधिकृत निवेदन जारी केलं. या निवेदनात म्हटले आहे की, “दिल्ली विमानतळावर घडलेल्या घटनेबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. आम्ही पीडितांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो व अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ अधिकृतरित्या कामावरून काढून टाकण्यात आलं आहे आणि सखोल चौकशी होईपर्यंत योग्य ती कारवाई केली जाईल, असं निवेदनात सांगण्यात आले आहे.