Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर, ५ फेब्रुवारीला होणार मतदान

Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर, ५ फेब्रुवारीला होणार मतदान

0
Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर, ५ फेब्रुवारीला होणार मतदान
Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर, ५ फेब्रुवारीला होणार मतदान

Delhi Assembly Elections : नगर : चर्चेत असलेली दिल्ली विधानसभेची निवडणूक (Delhi Assembly Elections) अखेर जाहीर झाली आहे. तशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी केली आहे. दिल्लीत भाजपा (BJP), काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) असा तिरंगी सामना पाहण्यास मिळणार आहे.

Delhi Assembly Elections
Delhi Assembly Elections

नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?

५ फेब्रुवारीला मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल

दिल्लीमध्ये ७० विधानसभेच्या जागा आहेत. दिल्लीत १.५ कोटी हून अधिक मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २.०८ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे

आप, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना (Delhi Assembly Elections)

लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन दिल्लीचं राजकारण तापलेलं पाहण्यास मिळालं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल या घरावर केलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत मोदी आणि अमित शाह यांनी केजरीवालांवर टीका करत निवडणूक प्रचाराची नांदीच दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.