नगर : आयपीएलमध्ये २०२४ च्या रणसंग्रामात काल (ता.७) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आमने सामने आले होते. यावेळी दिल्ली कॅपिटल्सनं २० धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. १७ व्या ओव्हरपर्यंत राजस्थानच्या हातात असलेली मॅच दिल्लीनं खेचून आणली. या सामन्यात कुलदीप यादवने एका षटकात दोन विकेट घेत बाजू पालटली आणि सामना जिंकला.
नक्की वाचा : कांदा निर्यातीला सरकारचा खोडा
कर्णधार संजू सॅमसनची ४६ चेंडूत ८६ धावांची खेळी (DC vs RR)
आयपीएल २०२४ च्या ५५ व्या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी घरच्या मैदानात फटकेबाजी करत राजस्थानसमोर ८ विकेट गमावत २२२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्याने ६ षटकार आणि ८ चौकार ठोकले. मात्र, मुकेश कुमारने त्याची विकेट घेत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अवश्य वाचा : ‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
दिल्लीच्या ३ गोलंदाजांची शानदार गोलंदाजी (DC vs RR)
रियान परागने २७ आणि शुभम दुबेने २५ धावा केल्या. मात्र राजस्थानला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. दुसरीकडे दिल्लीच्या ३ गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात मदत केली. कुलदीप यादवने ४ षटकात केवळ २५ धावा देत २ बळी घेतले. मुकेश कुमारने ३० धावांत २ आणि अक्षर पटेलने ३ षटकांत २५ धावांत १ बळी घेतला.