Delhi Red Fort Car Blast : नगर : दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या (Delhi Red Fort Blast) पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील गर्दीच्या ठिकाणी बसस्थानके तसेच रेल्वे स्थानकाची बॉम्ब शोधक पथकाने (Bomb Detection Team) आज (ता. ११) सकाळी पाहणी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएसचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांच्या पथकाने ही पाहणी केली.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
पथकातील श्वान लुसीने केली पाहणी
राजधानीत झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासन ही हाय अलर्टवर आले आहे. त्यानुसार शहरातील माळीवाडा बस स्थानक तसेच पुणे बस स्थानक परिसरात बॉम्ब शोधक पथकाने आज सकाळी तपासणी केली. गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची बॅग तपासण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकात ही तपासणी करण्यात आली. प्लँटफार्म वरील प्रवाशी, कचरा कुंडी येथे टाकलेला कचरा तसेच तिकीट घर परिसराची पाहणी पथकातील श्वान लुसीने केली.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
संशयास्पद आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधा (Delhi Red Fort Car Blast)
यावेळी बॉम्ब शोध पथकाचे संजय येठेकर, अंकुश कुलांगे, महेश शिंदे, सुभाष पाठारे, अहिल्यानगर लोहमार्ग पोलीस निरीक्षक राजू साळवे, सर्फराज खान, मदन माळी, प्रशांत देवडे, वनिता समिंदर, आसाराम येवले, रवींद्र देशमुख, अविनाश खरपास, राहुल चव्हाण, किरण तोडमल, अमित भरडकर, कैलास कीर्तीशाही, ऐश्वर्या वाठोरे, ऐश्वर्या शेंदरे, वैष्णवी दिकोंडा, दीपक कांडेकर, रेल्वे सुरक्षा बलचे (आरपीएफ) अधिकारी जे. बी. धनवडे, एकनाथ महारनवर, विशाल पायघन, विष्णू डोके, नरेश गायकवाड, विष्णू खंडागळे, संतोष पवार, सागर शिंदे, विकास साबळे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगर शहरात काही संशयित व्यक्ती अथवा काही वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलीस अथवा जवळ असलेल्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांनी म्हटले आहे.



