Democracy : लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम म्हणजेच ‘स्वीपनगरी’ : आयुक्त डांगे

Democracy : लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम म्हणजेच 'स्वीपनगरी' : आयुक्त डांगे

0
Democracy : लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम म्हणजेच 'स्वीपनगरी' : आयुक्त डांगे
Democracy : लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम म्हणजेच 'स्वीपनगरी' : आयुक्त डांगे

Democracy : नगर: “राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) माध्यमातून मतदान निवडणूक प्रक्रिया निरंतर चालू आहेत. लोकशाहीचे महत्त्व वारंवार अधोरेखित करण्यासाठी ‘स्वीपनगरी’ सारखा उपक्रम फार महत्त्वाचा आहे. अहिल्यानगर मनप स्वीप समितीचा ‘स्वीपनगरी’ हा कक्ष मतदार जनजागृतीतील (Voter Awareness) इतिहास ठरू शकतो.”असे प्रतिपादन यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले.

नक्की वाचा : सिसपे घोटाळ्याप्रकरणी निर्णायक वळण; पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

मतदार जनजागृतीसाठी ४ हजार स्क्वेअर फुटांचा स्वीप कक्ष

या कक्षाच्या निरीक्षणाप्रसंगी डांगे यांनी मतदार जनजागृतीच्या खेळांचा आनंद घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विजयकुमार मुंढे (अतिरिक्त आयुक्त) यांच्या संकल्पनेतून मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात स्वीप समितीच्या वतीने मतदार जनजागृतीच्या शेकडो संकल्पना असलेला सुमारे चार हजार स्क्वेअर फुटांचा स्वीप कक्ष उभारण्यात आलेला आहे.

अवश्य वाचा : देवेंद्र मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या… विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा

मतदान प्रक्रिया सोप्या पद्धतीने दाखवणारे मनोरंजक खेळ (Democracy)

भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे विविध जनजागृतीपर पोस्टर्स, मतदान प्रक्रिया साध्या सोप्या सुलभ पद्धतीने दाखवणारे मुलांसाठीचे मनोरंजक खेळ, माझी सही-माझी मनपा१०० टक्के मतदानाची सही असलेला उपक्रम, बाराखडीतून लोकशाही शिक्षण, माझी मनपा सेल्फी- वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंट्स, क्यू आर कोड वॉल, व्ही आर बॉक्सरचना, ईव्हीएम मशीनविषयक साक्षरता, मतदानाची नोटा पद्धत, भारतातील पहिला स्वीप केअर व्हॉट्सअप क्रमांक, आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्यासाठी चित्रकला स्पर्धेतील पोस्टर्स, विविध अँपची माहिती, मतदान प्रक्रियेतील घटकांच्या चिकाटी व गुणवत्तेचे प्रतीक असलेली एकी नावाची मुंगी, मतदानाच्या पायऱ्या दर्शवणारा स्थापू खेळ, नैतिक मतदानाचा सापशिडीचा खेळ, मतदान प्रक्रियेतील विविध अर्ज शोधण्याचा भुलभुलय्या खेळ, मतदान वर्णमालेचा तंबोला खेळ, चालत सहज सुलभ मतदान पद्धती खेळ, आदी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम या कक्षामध्ये आहेत.

हे देखील वाचा: मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले

“विविध शासकीय कामानिमित्ताने शहरभरातील व बाहेरील नागरिक नूतन मनपा कार्यालयास भेट देत असतात.शहराचे मुख्यालय असलेले या इमारतीत हा कक्ष स्थापन होताना नागरिकांचे प्रबोधन व्हावे असा स्वीप समितीचा मानस आहे.२६ जानेवारी पर्यंत स. 10 ते संध्या.6या वेळेत हा कक्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून शिक्षक , पालक यांनी आपल्या मुलांसह या कक्षाला जरूर भेट द्यावी,खेळ खेळावेत व लोकशाही प्रक्रियेची माहिती घ्यावी.” असे आवाहन अशोक साबळे (स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक),सपना वसावा (सहाय्यक आयुक्त),मेहेर लहारे (सहाय्यक आयुक्त),शशिकांत नजन (उद्यान विभाग प्रमुख),मतदारदूत डॉ.अमोल बागुल,प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे,प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे.