Demonstrations : नगर : महागाईने (Inflation) जगणे कठिण झाले…मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच आराेग्याचा प्रश्न गंभीर हाेत आहे. त्यामुळं विविध मागण्यांसाठी संतप्त विडी कामगारांनी जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयासमोरच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने (Demonstrations) केली.
नक्की वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल
आंदोलनात सहभाग (Demonstrations)
या आंदोलनात जनरल सेक्रेटरी ॲड. सुधीर टोकेकर, संघटनेच्या उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, भाकपचे राज्य सेक्रेटरी ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव ॲड. बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, संध्या मेढे, फिरोज शेख, सुलाबाई आदमाने, संजय नांगरे, एस. एल. ठुबे, सुमित्रा जिंदम, शोभा बिमन, लक्ष्मी कोटा, संगीता कोंडा, सगुना श्रीमल, भाग्यलक्ष्मी गड्डम, कविता मच्चा, विनायक मच्चा, वनिता दिकोंडा, अरुणा मंचे, शमीम शेख, पुष्पा बिमन, सुनीता बिटला, रेणुका बिरु, उर्मिला दिकोंडा, पूजा न्यालपेल्ली, उमा बोल्ली आदी सहभागी झाले हाेते.
अवश्य वाचा: कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच
शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप (Demonstrations)
महागाईच्या काळात विडी कामगारांना जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचे प्रश्न गंभीर असताना शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. विडी कामगारांना दर हजार विडीला २११.५० वेतन रुपये मिळते. या वेतनात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे. तर विडी कामगार पेन्शनरला फक्त सातशे ते हजार रुपये मिळत आहे. त्यामध्ये औषधांचा खर्चही भागत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विडी कामगारांना दर हजार विडीला अडीचशे ते तीनशे रुपये मिळावे, विडी कामगार पेन्शनरला कमीत-कमी तीन हजार रुपये पेन्शन द्यावी, केशरी रेशन कार्डधारकांना रेशनावर धान्य मिळावे, विडी कामगारांना अल्प दरात घरकुल योजनांचा लाभ मिळावा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वच बहिणींना मिळण्यासाठी त्यातील सर्व अटी रद्द करण्याची मागणी विडी कामगारांतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले. या मागण्यांची सोडवणूक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ॲड. सुधीर टोकेकर यांनी दिला.