Demonstrations: लाँग मार्चमधील मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी अकोलेत निदर्शने 

शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा

0

Demonstrations अकोले: राजूर ते निझरणेश्वर लॉंग मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, सी. टू. कामगार संघटना व डी. वाय. एफ. आय. युवक संघटनेच्यावतीने आज (ता.८) शेंडी (ता. अकोले) येथे तीव्र निदर्शने (Demonstrations) करण्यात आली. भंडारदरा धरणाला 100 वर्षे पूर्ण होत असून सरकारच्यावतीने भंडारदरा शताब्दी वर्ष (centenary year) साजरे करण्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र जसे धरणाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत तसेच येथील आदिवासींच्या विस्थापनालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या शंभर वर्षांमध्ये या आदिवासींना अजूनही विस्थापनाच्या मोबदल्यात मिळालेल्या जमिनीचा वर्ग एकचा मालकी ताबा मिळालेला नाही. अद्यापही परिसरातील शेतकरी भंडारदर्‍याच्या पाण्यापासून वंचित आहेत. किसान सभेने या मागण्यांवर सातत्याने संघर्ष केला आहे.

अवश्य वाचा: वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा (Demonstrations)

नुकत्याच निघालेल्या लॉंग मार्चमध्ये या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यांच्या अंमलबजावणीची आठवण करून देण्यासाठी शेंडी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. परिसरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झाले. जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर झालेल्या निदर्शनामध्ये आदिवासींच्या वरील मागण्या मान्य न झाल्यास शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. यानंतर भंडारदरा येथील राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून जथ्याची सुरुवात करण्यात आली. मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, शिंगणवाडी, पांजरे इत्यादी परिसरातील सर्व गावांमधून वाजतगाजत शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेल्या वाहनांमधून आपल्या मागण्यांची जनजागृती करत जत्था यशस्वी केला. मुरशेत येथे रात्री साडेअकरा वाजता प्रचाराची सांगता झाली. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, अर्जुन गंभीरे, संगीता साळवे, हेमलता शेळके, गणपत मधे आदींनी सहभाग घेतला.