Dengue Chikungunya : नगर : गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात विषाणूजन्य आजार (Viral disease) असणाऱ्या डेंग्यू, चिकनगुनिया (Dengue Chikungunya) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. जिल्ह्यात सध्या १५८ जणांना डेंग्यूची, १९ जणांना चिकनगुनियाची बाधा झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून समाेर आले आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणा (Health system) सतर्क झाली असून नागरिकांनी ताप, अंगदुखी यासह अन्य समस्या निर्माण झाल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा: शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल
जिल्ह्यात ९४० जण संशयीत डेंग्यूचे रुग्ण
जिल्ह्यात ९४० जण संशयीत डेंग्यूचे रुग्ण होते. यातील १५८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच शासकीय आरोग्य संस्थांनी केलेल्या तपासणीत ३४ जणांना चिकनगुनिया झाल्याचा संशय व्यक्त होत होता. यातील १९ जणांचे अहवाल बाधित आलेला आहे.
अवश्य वाचा: ‘आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख
आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरु (Dengue, Chikungunya)
जिल्ह्यात अनेक गावात सध्या फॉगींगसह अन्य उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी देखील शहरासह ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठणार नाही. त्यातून डासांची उत्पत्ती होणार नाही, यावर लक्ष द्यावे. ताप, अंगदुखी असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.