Department of Agriculture : नगर : कृषी विभागाकडून (Department of Agriculture) खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रात तांदूळ (Rice) २१ हजार, बाजरी ८५ हजार, मका ९१ हजार, तूर ७७ हजार, मूग ५१ हजार, उडीद ७१ हजार, भुईमूग ४ हजार, सोयाबीन १ लाख ९० हजार, ऊस २५ हजार तर कापूस १ लाख ५६ हजार हेक्टर असे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात ७ लाख ५१ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली होती. यंदा ती ७ लाख ७१ हजार हेक्टर म्हणजे २० हजाराने वाढणार आहे.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
जिल्ह्यात ७ लाख हेक्टर क्षेत्र विविध पिकांसाठी प्रस्तावित
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार हेक्टरने क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यामध्ये मका, तूर, कापूस या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाला भाव न मिळाल्याने यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटणार असल्याचे मानले जात आहे.
नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
विविध बियाणांचे वाण उपलब्ध (Department of Agriculture)
हंगामासाठी सार्वजनिक ३७ हजार ६१७ क्विंटल, खासगी ३९ हजार ६८८ क्विंटल असे एकूण ७७ हजार ३०५ क्विंटल बियाणे यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच कापसाचे ५ लाख ७४ हजार ८१३ पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे १२ कापसाच्या बियाणांचे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर १ लाख ३२ हजार ६२ मेट्रीक टन खत उपलब्ध आहे. या हंगामासाठी २ लाख १९ हजार २०७ मेट्रीक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख २४ हजार १४६ मेट्रीक टन खत साठा मंजूर आहे. मागील शिल्लक १ लाख ८ हजार ९४५ मेट्रीक टन आहे. तसेच ७ हजार १०० मेट्रीक टन संरक्षित साठा करण्यात आला आहे.