Department of Archaeology : अहिल्यानगर : भारत सरकारच्या (Government of India) सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (Archaeological Survey of India) वतीने त्यांच्या अखत्यारित असलेल्या ऐतिहासिक संरक्षित स्थळाच्या ठिकाणी हर घर तिरंगा यात्रेचे (Tiranga Yatra) आयोजन करण्यात आले. पुरातनच्या निर्देशानुसार शहरातील अहमद निजाम शाह यांच्या स्मारक स्थळी देखील या हर घर तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
ऐतिहासिक ठिकाणी हर घर तिरंगा यात्राचे आयोजन
सोमवारी (दि.११) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळ प्रमुख अधीक्षक पुरातत्त्वज्ञ डॉ. शिवकुमार भगत यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर उपमंडल मधील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत येणारे ऐतिहासिक ठिकाणी हर घर तिरंगा यात्राचे आयोजन टोंब ऑफ निजाम अहमदशहाच्या स्मारक स्थळी करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी इतिहास तज्ञ भूषण देशमुख, दादासाहेब रुपवते विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
विद्यार्थी, शिक्षक व पुरातत्व कर्मचारी सहभागी (Department of Archaeology)
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व अहिल्यानगर उप मंडळ कार्यालयाचे संवर्धन सहाय्यक संतोष महाजन, शिवाजी गायकवाड, संदीप हापसे, सतीश भुसारी, करीम शेख इत्यादी कर्मचारी वर्गाने या यात्रेच्या आयोजनात नियोजनाची भूमिका बजावली. बहुजन शिक्षण संघाच्या दादासाहेब रुपवते विद्यालयाचे पर्यवेक्षक जयंत गायकवाड, महेंद्र कदम, संजीवन साळवे, अजय भिंगारदिवे, अनिता हंगेकर, सुनीता पटेकर, नितीन कसबेकर यांच्या संचालनात इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या यात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. दादासाहेब रूपवते हायस्कूलपासून रॅलीची सुरुवात करण्यात आली होती. रॅली बालिकाश्रम रोड, साताळकर हॉस्पिटल, बागरोजा हडको परीसरातुन थेट अहमदशहा स्मारकावर पोहचली. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक कर्मचारी व पुरातत्व कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणा रॅली दरम्यान दिल्या.