Deportation : नगर : जिल्ह्यातील राहाता (Rahata) तालुक्यातील ममदापूर परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या सराईत टोळीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी एक वर्षाकरिता हद्दपार (Deportation) केली आहे.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
हद्दपार केलेल्या टोळीचे नावे
नियाजअहेमद फकीरमहंमद शेख (कुरेशी), वय ४०, (रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर,ता. राहाता,जि.अहिल्यानगर) व टोळी सदस्य सद्दाम फकीर महंमद शेख (वय ३०), जकरीया शब्बीर कुरेशी (वय ३२), वसीम हनिफ कुरेशी (वय २८), कैफ रऊफ कुरेशी (वय २४), अरबाज अल्ताफ कुरेशी (वय २४), असे हद्दपार केलेल्या टोळीचे नावे आहेत.
अवश्य वाचा : अशोक गायकवाड सह पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात
सराईतपणे केले आहेत गुन्हे (Deportation)
या टोळीने राहाता, लोणी पोलीस ठाणे हद्दीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत राहण्याकरीता अवैध अग्निशस्त्र विक्री करणे, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, गैर कायदयाची मंडळी जमवून घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, जिल्हादंडाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणे, गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांसची वाहतूक करणे, असे गुन्हे सराईतपणे केले आहे.
या टोळीला प्रतिबंध घालण्यासाठी लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना सादर केला. घार्गे यांनी सखोल चौकशी करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना सादर केला. त्यांनी एक वर्षाकरिता या सराईत टोळीला हद्दपार केले.