Deputy Chief Minister Ajit Pawar : नगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्य जनतेचा आवाज होते. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. या दुर्दैवी विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्याच कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या (Hardin Morning Group) वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे संजय सपकाळ (Sanjay Sapkal) यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अजित पवार यांना श्रद्धांजली
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विमान दुर्घटनेत निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही श्रद्धांजली सभा भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे पार पडली. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅप्टन शांभवी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी व सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. सर्व दिव्यगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित (Deputy Chief Minister Ajit Pawar)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकल्याची भावना व्यक्त केली. या श्रद्धांजली सभेसाठी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, जहीर सय्यद, संजय भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, जियान सय्यद, मेजर दिलीप ठोकळ, ज्ञानेश्वर महाराज अनावडे, दिलीप गुगळे, अशोक पराते, दीपक धाडगे, दिनेश शहापूरकर, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, सदाशिव मांढरे, विलास आहेर, दीपक मेहतानी, दीपक घोडके, रतन मेहेत्रे, दीपक लिपाने, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, सरदारसिंग परदेशी, प्रकाश देवळालीकर, अनिलराव सोळसे, शंकरराव पंगुडवाले, सुंदरराव पाटील, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, कोंडीराम वाघस्कर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, अनिल शिरसाठ, दीपक अमृत, विशाल भामरे आदींसह हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन चोपडा म्हणाले की, “ही घटना अत्यंत वेदनादायक असून मन हेलावून टाकणारी आहे. अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात विकास, प्रशासन आणि लोककल्याणाला प्राधान्य दिले. कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या वैमानिक व कर्मचाऱ्यांचा त्याग देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील, असे त्यांनी म्हटले.



