Developed India : नगर : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून विकसित भारत (Developed India) संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सामान्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले
शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थितीश होते.
नक्की वाचा : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली
विखे पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये ही यात्रा पोहोचून योजनांचा जागर केला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये नगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. एकही लाभार्थी केंद्र व राज्य शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी केले.