Kartiki Ekadashi : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे.

0
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा

नगर : आज कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) पंढपूरमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे. एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता 

तर, यंदा कार्तिकी एकादशीला नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील  बबन विठोबा घुगे आणि वत्सला घुगे यांना मानाचे वारकरी म्हणून पुजेचा मान मिळाला आहे. घुगे दांपत्य हे मागील १५ वर्षांपासून न चुकता विठलाची वारी करत आहेत. याचंच फळ म्हणून त्यांना महापूजेचा मान मिळाला आहे.

हेही वाचा : पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात बेडचा तुटवडा

आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशी देखील मोठ्या उत्साहात पंढपूरमध्ये साजरी केली जात आहे. अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज (ता. २३) पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवस आधीच  पंढरपूरात दाखल झाले होते.यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी ठरलेल्या घुगे दाम्पत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here