Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : अहिल्यानगर : नागपूर झालेल्या दंगल (Nagpur violence) प्रकरणी आत्तापर्यंत 92 लोकांना अटक झाली आहे. आरोपींमध्ये काही अल्पवयीन सुद्धा आहेत. दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. नुकसान भरपाई (Damage Compensation) दिली नाही तर दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार, अशी आक्रमक भूमिका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे.

अवश्य वाचा : यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी : दादा भुसे

हिंसाचारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू

नागपुरमध्ये दोन गटांत उफाळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नक्की वाचा : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, (Devendra Fadnavis)

नागपूरचे पोलीस आयु्क्त, एसपी आणि सर्व वरिष्ठ उपस्थितीत घटनेचा आढावा घेतला. यासंदर्भात मुळातच काही गोष्टी सभागृहात स्पष्ट केल्या होत्या. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली, त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, प्रतिकात्मक कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जळाली, अशाप्रकराचा एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र झाला. जमावाने तोडफोड केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी जवळपास ४-५ तासांत या संपूर्ण दंगलीवर आवर घातला. त्याकरता अश्रूधुराच्या नळकांड्या आणि इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक पोलिसांनी केल्या.

झालेलं नुकसान दंगेखोरांकडून वसूल
जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार आहे. अशा गोष्टी महाराष्ट्रात सहन केल्या जाणार नाहीत. अशाप्रकारेच दंगेखोरांना सरळ केलं जणार आहे”, असा सज्जड दमही त्यांनी दिला.