Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी राम शिंदेंचा बेरर चेक 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी राम शिंदेंचा बेरर चेक 

0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : नगर : मागील पाच वर्षांत कर्जत-जामखेडमध्ये केवळ बोलबच्चन मिळाले. राम शिंदे (Ram Shinde) यांना विधानपरिषदेवर (Legislative Council) घेतल्यावर पुन्हा कर्जत-जामखेडमधील विकासकामांना गती मिळाली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचारसभेत केले. आमदार राम शिंदे यांना उद्देशून ते म्हणाले, मी तुमचा बेरर चेक आहे. तुम्ही जेवढ्या योजना मागतील तेवढ्या योजनांसाठी निधी मिळेल, असे राम शिंदेंना त्यांनी आश्वस्त केले.

हे देखील वाचा: वकिलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गजाआड

सुजय विखे पाटील यांची प्रचारसभा

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रचारसभा आज जामखेड येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे, आमदार सुरेश धस, उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नक्की वाचा: भारतातील लोकशाही संकटात : पवार

देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis)

ही देशाची निवडणूक आहे. ग्रामपंचायतची निवडणूक नाही. सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे. सध्या देशात दोन राजकीय गट तयार झाले आहेत. एक गट विश्वनेते नरेंद्र मोदी यांची महायुती तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली २४ पक्षांची खिचडी आहे. सकाळी येणारे बडबडवीर पाच वर्षांत पाच पंतप्रधान करू, असे सांगत आहेत. ते सत्तेत आले तर पंतप्रधानपदाची संगीत खुर्ची करतील. हा देश त्यांची खासगी मालमत्ता नाही. देशाला मजबूत पंतप्रधान हवा आहे. त्यांच्याकडे केवळ डब्बे आहेत. इंजिन नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis


सुजय विखे म्हणाले, जामखेडच्या लोकांना नगरला यायला अडीच तास लागायचे. आता केवळ ५५ मिनिटात जातो. हा जनसामान्यांच्या पुढे केलेला विकास आहे. जामखेडमधून जाणाऱ्या रस्त्याचेही चौपदरीकरणाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. समोरच्या उमेदवाराची माहिती टीव्ही अथवा मोबाईलवर जाणून घेऊ नका. पारनेर तालुक्यातील लोकांकडून माहिती घ्या. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. माझा अनुक्रमांकही तीन आहे. दोन नंबरवाल्यांनाच दोन अनुक्रमांक मिळाला असल्याची टीका त्यांनी विरोधकाचे नाव न घेता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here