Devendra Fadnavis : नगर : अहिल्यानगर येथील भिंगार (Bhingar) शहरासह राज्यात पाच स्वतंत्र नगरपालिका (Municipality) स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानभवनातील बैठकीत काल (गुरुवारी) घेतला. त्यामुळे भिंगारमध्ये छावणी मंडळा (Ahmednagar Cantonment Board) ऐवजी ‘क’ वर्ग नगरपालिका स्थापन होणार आहे. याची कार्यवाही तीन महिन्यात सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.
नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड
या कटकमंडळांचे महापालिका क्षेत्रात विलिनीकरण
पुणे, खडकी कटकमंडळ पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटकमंडळ छत्रपती संभाजी नगर महापालिकेमध्ये देवळाली व अहमदनगर कटकमंडळ स्वतंत्र नगरपालिकामध्ये कामठी कटकमंडळ येरखेडा नगरपंचायत मध्ये समाविष्ट होणार आहेत. विधानभवन येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, संग्राम जगताप, जिल्हाधिकारी पंकज आशिया आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा
मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले की, (Devendra Fadnavis)
गेली अनेक वर्षे कटकमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणी मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या महापालिका,नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रात पुणे,खडकी,देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, भिंगार, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे.प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती आहे हे लक्षात घेवून काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे. या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे,कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावीत.या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भिंगारमधील छावणी मंडळ दीड वर्षांपूर्वी बरखास्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर हे छावणी मंडळ महापालिकेत घ्यावे की स्वतंत्र नगरपालिका करावी यावर सरकारचा विचार सुरू होता. भिंगारमधील छावणी मंडळाला महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार अहिल्यानगर महापालिकेला प्रस्तावही मागविला होता. मात्र, या प्रस्तावाच्या चर्चेनंतर भिंगारमध्ये महापालिका येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या शिवाय महापालिका क्षेत्र व भिंगार यामध्ये सैन्य क्षेत्र असल्यामुळे हा भाग सलग ठरत नव्हता. शिवाय अहिल्यानगर महापालिकेचा अस्थापना खर्च वाढणार होता. कचरा संकलनाचाही प्रश्न उद्भवत होता. ही प्रशासकीय बाब लक्षात घेता अखेर भिंगारमध्ये नगरपालिका करण्याचा निर्णय झाला आहे. २०११च्या जनगणनेनुसार भिंगारमध्ये २८ हजार ९८६ लोक राहतात.१२. १७ चौरस किमी एवढे भिंगारचे क्षेत्रफळ आहे.