Devendra Fadnavis : ब्रह्माकुमारीची राखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

Devendra Fadnavis : ब्रह्माकुमारीची राखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

0
Devendra Fadnavis : ब्रह्माकुमारीची राखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना
Devendra Fadnavis : ब्रह्माकुमारीची राखी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना

Devendra Fadnavis : नगर : योगीराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज (Gangagiri Maharaj) यांचा अखंड हरिनाम सप्ताह नुकताच झाला. सप्ताह सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपस्थित झाली. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या (Prajapita Brahmakumaris Divine University) सोनई सेवाकेंद्राच्या संचालिका बी के उषादीदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधली. यावेळी बी के १८३ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हरके (Dr. Deepak Harke) उपस्थित होते.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर!

कृषी महोत्सवात तीनशे स्टॉलद्वारे मार्गदर्शन

याच दरम्यान कृषिमहोत्सव देवगाव शनी येथे आयोजित करण्यात आला होता. या कृषी महोत्सवात तीनशे स्टॉलद्वारे संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन जैव, ऊर्जा वाटिका, शेती लघू उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली होती.

अवश्य वाचा : कबुतरखान्याचा वाद नेमका काय? जैन समाजाचा या वादाशी काय संबंध ?

इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (Devendra Fadnavis)

याची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांना प्रदान केले. यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे उपस्थित होते.