Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याची तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ

0
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याची तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याची तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ

Devendra Fadnavis : नगर : लोकसभा २०२४ चा निकाल भाजपसाठी (BJP) अपेक्षित असा मिळाला नाही. भाजपाला देशभरात २४० जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रात फक्त ९ जागांवर यश मिळालं आहे. या निकालांची नैतिक जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी मी चर्चा करेन असं म्हटलंय. निवडणुकीत हार-जित होत असते असंही म्हटलं आहे. तर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका

जागा कमी आल्याची जबाबदारी माझी – फडणवीस (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं आहे. तसेच, या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं ते म्हणाले आहेत. “कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. असे म्हणत त्यांनी पक्षाच्या संघटनांसाठी पूर्णवेळ मिळावा म्हणून मला पक्षाने सरकारमधून मुक्त करावे अशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याची तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्याची तयारीत; निवडणुकीत हार-जीत होत असते : छगन भुजबळ

नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!

एकट्या फडणवीसांवर ठपका ठेवणं योग्य नसल्याचे भुजबळांचे मत (Devendra Fadnavis)

त्यांच्या या भूमिकेनंतर छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्यामुळेच हे सगळं झालं असावं असं वाटत असावं. यश आणि अपयश असेल ही सगळ्यांची जबाबदारी आहे. एकावर ठपका ठेवण्यात काही अर्थ नाही असं माझं मत असल्याचे म्हटले आहे. महायुतीचं जहाज थोडसं वादळात अडकलं आहे. अशावेळी जे कॅप्टन आहेत त्यांनी अशी भूमिका घेणं बरोबर होणार नाही. सगळ्यांनी एकत्र राहून विधानसभेची जोरदार तयारी करायला हवी. देशात अनेक ठिकाणी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे त्याचा ठपका एकट्या फडणवीसांवर ठेवणं योग्य नाही. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत, सगळे तुमच्या पाठिशी आहोत. आगामी विधानसभा निवडणूक चार महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत, त्यात हे अपयश धुऊन काढलं पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here