Devendra Fadnavis : महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याचे लक्ष – मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूकीचे केंद्र बनवण्याचे लक्ष - मुख्यमंत्री फडणवीस

0
Devendra Fadnavis : महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूकीचे केंद्र बनवण्याचे लक्ष - मुख्यमंत्री फडणवीस
Devendra Fadnavis : महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूकीचे केंद्र बनवण्याचे लक्ष - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : नगर : महाराष्ट्र (Maharashtra) हे जागतिक गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक डेस्टिनेशन बनवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सध्या शासन (Government) व्यवस्थेत अनेक बदल होत आहे. शासन हे केवळ ‘स्टेट’ म्हणून नव्हे तर एक ‘इन्स्टिट्यूशन’ म्हणून प्रणाली उभी करण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे शासनाची कार्यपद्धती व्यक्तीनिष्ठ न राहता संस्थात्मक स्वरूपात उभी राहील आणि शासनाचे निर्णय व कामकाज संस्थात्मक पातळीवर रुजतील व ते कायमस्वरूपी टिकून राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर; २०१८च्या प्रभाग रचनेत अंशतः बदल

10 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प सुरू

महाराष्ट्रात ₹10 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प सुरू असून यात महामार्ग, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प, शहरी विकास आणि जलपुरवठा यांचा समावेश आहे. वाढवण बंदर व समृद्धी महामार्ग यांचा प्रामुख्याने उल्लेख करत, समृद्धी महामार्गाद्वारे राज्यातील 26 जिल्हे या बंदराशी जोडले जातील, ज्यामुळे लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : मोहटा येथील शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

देशातील पहिले मल्टी-मोडल हब उभे राहणार (Devendra Fadnavis)

वाढवण येथील परिसरात देशातील पहिले मल्टी-मोडल हब उभे राहणार आहे. या ठिकाणी पोर्ट, एअरपोर्ट, बुलेट ट्रेन आणि महामार्गाचे संपूर्ण जाळे उपलब्ध असेल. या भागात चौथी मुंबई तयार होत आहे. त्याचबरोबर नवी मुंबईत युनिव्हर्सिटी टाउनशिप, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि इनोव्हेशन सिटी विकसित होणार आहेत.

औद्योगिक गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र देशातील 30% उत्पादन करत आहे, आता पुणे, नागपूर, विदर्भ आणि मराठवाड्यात नवे औद्योगिक केंद्रे उभारत असल्याने राज्य औद्योगिक नकाशावर अग्रगण्य आहे. शिवाय सौर, वारा, हायड्रोजन व स्टोरेज यावरही भर देण्यात येत असून सार्वजनिक वाहतूकही संपूर्णपणे नूतनीकरणीय ऊर्जेवर नेण्याचा शासन प्रयत्न करत आहे. स्पिरिच्यूअल टुरिझम आणि कोस्टल टुरिझम यांना चालना देण्यासाठी शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्प हाती घेतले असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.