Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम; गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम; गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

0

Devendra Fadnavis : नगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राजीनामा देण्यावर ठाम आहे. त्यांनी राजीनामा दिल्यावर भाजपचे (BJP) संकटमाेचन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी (Deputy Chief Minister) वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार

फडणवीस व शाह यांची बैठक

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. 

अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!

पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडवर (Devendra Fadnavis)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहे. भाजप संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनादेश यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना, कामाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात विभागवार भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here